मराठी, हिन्दी व इंग्रजी या तीनही भाषा विभागाच्या वतीने वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले

वाङ्मय  मंडळ शै.वर्ष २०२२-२३

अहवाल

                दिनांक १७ सप्टेंबर २०२२, शुक्रवार रोजी  महाविद्यालयात मराठी, हिन्दी व इंग्रजी या तीनही भाषा विभागाच्या वतीने वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद शर्मा हे होते, तर या मंडळाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख, डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जे.डी .परदेशी, सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विभाग, यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड. तसेच डॉ. सुनील काळे, सहाय्यक प्राध्यापक, कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली, लिंबाजी, व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.बी.लांब, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                वाङ्मय मंडळाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना  डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करून स्वतःचा विकास करावा आणि  आपले करिअर घडवावे, तसेच आपल्यामधील स्वत्वाचा शोध घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवावे. असे अवाहन  केले.

                 डॉ. सुनील काळे यांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता जोपासण्यासाठी वाङ्मय मंडळ आणि भित्तिपत्रकाचे योगदान याविषयी विस्तृत भाष्य केले. विद्यार्थ्यांनी आपल्यातील सर्जनशील लेखक ओळखावा व लिहिते व्हावे, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात नियमित निघणारे भितीपत्रक असो, किंवा विद्यार्थ्यांच्या लेख, कविता, कथा चारोळी अशा साहित्याला प्राधान्य देणारे वार्षिक अंक असो, या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःला अभिव्यक्त केले पाहिजे असे  त्यांनी सांगितले.

                   डॉ. जे.डी .परदेशी यांनी विद्यार्थ्यांना वाङ्मयiशी निगडित विविध कला प्रकारात लिहिते होण्याचे अवाहन केले. विद्यार्थ्यांनी कविता, निबंध, वादविवाद, वक्तृत्व या माध्यमातून  कलागुण जोपासण्याचे  अवाहन त्यांनी केले.

                    मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांच्या विद्यार्थ्यांनी त्या- त्या भाषा विषयाचे भित्तिपत्रके तयार करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख, डॉ. प्रमोद पाटील यांनी, तर सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख, डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार  इंग्रजी विभागप्रमुख, डॉ. संतोष चौथाईवाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रमेश मेंढे, डॉ.दिलीप  अगरवाल, डॉ. मनीषा मुगळीकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.                                               

कार्यक्रमाची छायाचित्रे

कार्याक्रमचे सूत्रसंचालन करतांना समन्वयक डॉ.अनिरुद्ध मोरे, व्यासपीठावर प्राचार्य डॉ.प्रमोद शर्मा व प्रमुख अतिथी

मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या भित्तिपत्रकाचे विमोचन करतांना डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर व इतर मान्यवर

हिंदी भाषा साहित्यमंचच्या भित्तिपत्रकाचे विमोचन करतांना डॉ. सुनील काळे  व इतर मान्यवर

इंग्रजी भाषा Literary Forum च्या भित्तिपत्रकाचे विमोचन करतांना डॉ.जे.डी .परदेशी व इतर मान्यवर

वाङ्मय मंडळाचे उद्घाटकीय भाषण करतांना डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर व इतर मान्यवर

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.सुनील काळे (सहाय्यक प्राध्यापक, कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली,)  

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.जे.डी .परदेशी, (सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड.

      कार्यक्रमात पाहुण्यांचे आभार व्यक्त करतांना  इंग्रजी विभागप्रमुख, डॉ. संतोष चौथाईवाले.